मध्य रेल्वे विस्कळीत, तब्बल ३० लोकल रद्द

Pratahkal    21-Aug-2024
Total Views |
Central Railway
 
बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ३० गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच लांबपल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या. बदलापुरात शाळकरी मुलींवर लैंगिक - अत्याचार घटनेच्या विरोधात - हजारो नागरिक रेल्वे ट्रॅकवर - उतरले. सकाळी १० वाजल्यापासून हे आंदोलन सुरु असल्याने अंबरनाथच्या पुढे - एकही लोकल जाऊ शकली नाही. रेल रोकोचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला. लोकल ट्रेन प्रमाणेच लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. अनेक रेल्वे ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. बदलापूर आंदोलनामुळे ३० मेल एक्सप्रेस आणि ३० लोकल सेवा वळवण्यात आल्या. सुमारे १२ मेल एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या आहेत. या गाड्या बदलापूरनंतर दिवा आणि पनवेल मार्गे कर्जतकडे मार्गस्थ करण्यात आल्या आहेत.