वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना

पंढरपुरात असणार वारकरी महामंडळाचे मुख्यालय

Pratahkal    16-Jul-2024
Total Views |
Varkari Pension Scheme
 
Varkari Pension Scheme मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) 'ज्ञानोबा, माऊली, तुकाराम' अशा जयघोष करत असंख्य वारकरी पंढरीला पोहचले आहेत. विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला दोन दिवस शिल्लक असताना आता राज्य सरकारने वारकऱ्यांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे.
 
या मुख्यालयात प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासोबतच या महामंडळाचे भाग भांडवल ५० कोटी इतके असणार आहे. यासोबतच किर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिले जाणार आहे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.
 
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनांबद्दल घोषणा करण्यात आली होती. आता आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून याबद्दलच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे.
 
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या माध्यमातून सर्व पालखी मार्गाची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन त्याचे नियोजन केले जाणार आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच, वारकरी भजनी मंडळाला भजन आणि किर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान दिले जाणार आहे.
 
तसेच पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाणार असून चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही देखील केली जाणार