मरीन ड्राइव्ह ते हाजी अली फक्त ९ मिनिटांत

11 Jun 2024 11:54:58
Marine Drive to Haji Ali
 
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील (Mumbai Coastal Road Project) दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते हाजी अली (Marine Drive to Haji Ali) दरम्यानचा दुसरा बोगदा सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. सव्वा सहा किलो मीटरचा मुंबई ते हाजी अली अशा दुसऱ्या टप्प्यातील कोस्टल रोडचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा खुला करण्यात आला आहे.
 
उर्वरित कामामुळे शनिवार आणि रविवार हा मार्ग बंद राहणार असून, या रोडमुळं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्हिटेज कारमधून कोस्टल रोडची पाहणी केली. तसेच कोस्टल रोडचे तिसऱ्या टप्यातील उद्घाटन जुलैमध्ये होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोस्टल रोडचं अनेकांनी कौतुक केलं, 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले. असा हा प्रकल्प मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलदगतीने होईल आणि मरीन ड्राईव्ह ते हाजी अली अवघ्या ९ मिनिटात गाठता येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड दक्षिण प्रकल्प ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलीय, मंगळवारी (११ जून) सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे १६ तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीला नियमितपणे खुला करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0