मान्सूनसाठी एमएमआरडीए सज्ज!

01 Jun 2024 11:47:07
MMRDA ready for monsoon
 
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने  (Mumbai Metropolitan Region Development Authority) (MMRDA) मान्सूनच्या पार्श्वभुमीवर आपल्यालिन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. सदर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असणार आहे. य कक्षच्या माध्यमातून नागरिकांकडून येणान्य तक्रारीचे निरसन आणि निवारण करण्यासवे नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था इत्यादी विविध आपत्ती निर्देत्रण संस्थांशी समन्वय साधण्यात येणार आहे. मन्सुतमध्ये येणान्य समस्यंवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने पुर्ण तयारी केली आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी सांगितले.
 
एमएमआरडीएने स्थापन केलेला नियंत्रण कक्ष ०१ नून, २०२४ ते १५ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत कार्यरत असणार असून नागरीक ०२२- २६५९१२४१, ०२२-२६५९४५७६, ८६५७४०२०१० आणि १८००२२८८०१ (टोल फ्री) या हेल्पलाईन क्रमांकांच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांची आणि पादचाऱ्यांची गैरसोय कमी करण्यास्वती एमएमआरडीएने आपत्कालिन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. झडे उन्मळून पडगे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोडी, खड्रे अशा विविध बाबींवर नागरिकांना नियंत्रण कक्षाची मदत घेता पेणार आहे. नियंत्रण कक्षाचे कर्मचारी २४ तास आणि तीन शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत. सध्या एमएमआरवैएण्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो रेल प्रकल्प, सांताक्रूझ चेबूर लिंक रोड विस्तार, ऐरोली-काटाई नाका बोगदा अगि उन्नत रस्ता प्रकल्प, शिवडी-जरळी कनेक्टर, डैडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, सूर्य प्रादेशिक पाणीपुरवठा येजना त्यासोबतच एमयुआयपी आणि ओएआरडीएस अंतर्गत विविध रस्ते अणि पुलांची कामे वसारणी प्रकल्प राचवत आहे. उद्‌भवणान्या आपल्बलिन परिस्थितीसाठी प्रत्येक मेट्रो प्रकल्प स्थळी १ अभियंता आणि १० मजुरांची टीम (आपत्कालीन दल) तैनात असेल, विविध मैट्रो प्रकल्पस्थळी अशा एकूण १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात करण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0