महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार

एकूण ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी तर ६ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

Pratahkal    16-Dec-2024
Total Views |
 
Mahayuti
नागपूर, दि. १५ (वार्ताहर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि ३९ मंत्र्यांचा शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडला, नागपूरमध्ये शपथविधी सोहळयत भाजपकडून प्रथम क्रमांकाचे शपथ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतले, तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यमुळे महायुती सरकारमध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर बावनकुळे परिष्ठ नेते असतील, राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ, तर गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेमध्ये नेते असतील.
 
तिन्ही पक्षाच्या ३९ नेत्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल से पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेचे शपथ दिलले. त्यामध्ये, ३३ कैचिनेटमंत्री तर ६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या मंत्रिमंडळात परिचम महाराष्ट्रातील १०, विदर्भातील नऊ, ठाणे कोकण भागातील आव, उत्तर महाराष्ट्रातील सात, मराठवाडातील सहा, तर मुंबईतील दोन चेहऱ्यांचा समावेश आहे. आज झालेल्या शपथविधीत भाजपाच्या १९ शिवसेनेच्या ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपच घेतली.
 
दरम्यान, तब्बल ३३ वर्षानंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अणि शप प्रविधी सोहळा झाला. यापूर्वी २१ डिसेंबर १९९१ रोजी काँग्रेसचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार करण्यात आला होता. महाराष्ट्रात दोन विधानसभा इमारती आहेत, एक मुंबईत आणि दुसरी नागपुरात, विधानसभेचे अर्थसंकल्प आणि पावसाळी अधिवेशन मुंबईत होते. तर हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होत आहे. त्यामुळेच शपथविधी सेहळा मुंबईऐवजी नागपुरात संपन्न झाला.