मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते मुंबईत दोन सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी खारघर आणि शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा उद्या दुपारी एक वाजता छत्रपती संभाजीनगर येथे होईल. त्यानंतर नवी मुंबईतील सेंट्रल पार्क खारघर येथे दुपारी ३ वाजता मोदींची दुसरी सभा पार पडेल. नवी मुंबईची सभा आटोपून मोदी संध्याकाळी सहा वाजता दादर, शिवाजी पार्क येथे आयोजित सभेला संबोधित करतील.
रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता खारघर येथे मोदी यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. सेक्टर २९ मधील मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात ही सभा पार्किंग झोन असणार आहे. तर होणार आहे. या सभेसाठी ५० हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे भव्य व्यासपीठ उभारले आहे. खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्यात आले आहे.
तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्वानपथकाद्वारे या जागेची तपासणी करण्यात येत आहे. सभा सुरळीत पार पडण्यासाठी नवी पोलिसांकडून विशेष करण्यात येत आहेत. मुंबई प्रयत्न तर शिवाजी पार्क येथे राज ठाकरेंचे घर आहे. तिथेच नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. यामुळे आता ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खारघर व दादर या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल केले आहेत. शिवाजी पार्क परिसरातील अनेक रस्त्यावर गुरुवारी नो स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक पर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.
याबाबत पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत रहदारीचे नियमन केले जाईल, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांसह प्रमुख मार्गावर वाहनांची वर्दळ वाढण्याची अपेक्षा आहे. शिवाजी पार्कच्या आजूचाजूच्या अनेक प्रमुख रस्त्यांवर निर्बंध लागू होतील. गदींचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नो-पार्किंग झोन स्थापित केले आहेत.