ट्रक- डंपर चालकांचे रास्ता रोको आंदोलन

02 Jan 2024 10:53:11

Truck Driver Protest 
 
नवी मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने (Central Govt) हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्याविरोधात बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही, असं वाहन चालकांचे म्हणणं आहे. तसेच नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे.
 
मात्र, आणणाऱ्या अपघात घडवून व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल. या नवीन कायद्याच्या विरोधात नवी मुंबई मध्ये एनआरआय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जेएनपीटी रोड वर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे. तेथील ड्रायव्हर लोकांनी रस्त्यांवर येऊन रास्ता रोको आंदोलन केलं. नवी मुंबईतील रेती बंदर येथे ४० ते ५० ट्रक चालकांनी रास्ता रोको केला. यावेळी या ट्रक चालकांनी पोलिसांवर लाठीचार्ज हाणामारी करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळत आहे.
 
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलाने मोठा वादंग निर्माण झाला आहे. या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकारही समोर आला आहे. शिवाय आंदोलक ट्रक चालकांना गाड्यांवर दगडफेक तोडफोड केली आहे. केंद्र सरकारने दुरुस्त केलेल्या कायद्यानुासर अपघातास जबाबदार ट्रकचालकाला बारा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याला ट्रकचालकांनी विरोध केला आहे. ही दुरुस्ती मागे घेण्यासाठी आता ट्रक चालक रस्त्यावर उतरुन तीन दिवसांचा संप पुकारला आहे. ट्रकचालक एवढा दंड कसा भरणार, हा अत्याचार असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
Powered By Sangraha 9.0