राज्यभरात दहीहंडीचा थरार!

Pratahkal    08-Sep-2023
Total Views |
 
janmashtami celebration, hindi film industry, cultural celebration, dahi handi festival, mumbai dahi handi, thane dahi handi, govinda pathak, maharashtra pollution control, environmental awareness, political leaders, celebrity participation, eknath shinde, devendra fadnavis ,shiv sena, lalbaug dahi handi, varali dahi handi, marathi film industry, prakash surve, ram kadam, nishtha dahi handi, yogurt, dahi handi 2023, maharashtra, maharashtra, mumbai, thane, govinda squad, political leaders, political leaders
 
मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी ) : जन्माष्टमीचा (Janmashtami) सण गुरूवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषत मुंबई (Mumbai), ठाण्यात (Thane) उंच उंच दहीहंडी (Dahi Handi) फोडण्यासाठीचा थरार पाहायला मिळाला. मुंबई, ठाण्यात (Mumbai, Thane) आज दहीहंडीचा (Dahi Handi) चांगलाच उत्साह दिसून आला. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा (Govinda Pathak) उत्साह आणखीच शिगेला पोहचला. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी ९ थर रचण्यात आले.
 
दादर येथील आयडियल बुक डेपोजवळ महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून दहीहंडी साजरी करण्यात आली. या ठिकाणी पर्यावरण विषयावरील पथनाट्य सादर करण्यात आली. या ठिकाणी, महिला, दिव्यांगांनी दहीहंडी साजरी केली.
मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष होता. कुठे आठ थराच्या तर कुठे नउ थरांच्या हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाकडून यशस्वी सलामी देण्यात आल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री, अभिनेत्यांनी प्रमुख आयोजक असलेल्या गोविंदा मंडळांच्या व्यासपीठावर हजेरी लावली.
 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांची रेलचेल दिसून आली. वर्तक नगर येथे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठ नने दहीहंडीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध कलाकारांनी उपस्थित राहत गोविंदा पथकाचा उत्साह वाढवला.
 
टेंबी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. या ठिकाणीही अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावली. अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजनकरण्यात आले.
 
यंदा मुंबईत जवळपास १८ हजार दहीहंड्या उभारल्या गेल्या. यात भाजपच्या वतीने ४०० दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंड्या फोडण्यासाठी केवळ मुंबईत सुमारे ९०० गोविंदा पथकांनी प्रयत्नांची शिकस्त केली. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली. तर वरळीत परिवर्तनाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. घाटकोपर येथे आमदार राम कदम, दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून निष्ठा दहीहंडीचे ही आयोजन करण्यात आले होते. तर, आमदार प्रकाश सुर्वे मागाठणे येथे दहीहंडीचे आयोजन केले. या दहीहंडी उत्सवात विविध राजकीय नेत्यांसह मराठी, हिंदी चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली.