मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी ) : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांना आता आदित्य
घेरण्यात आले होते. ठाकरे कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती आहे.
दिशा सालियन प्रकरणामध्ये ज्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा आदित्य ठाकरे ठोकणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाचा तपास आमच्याकडे सोपवण्यात आला नसल्यामुळे संबंधित प्रकरणाचा तपास करत नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण म्हणजेच सीबीआयने दिले आहे. सीबीआयने यासंदर्भात परिपत्रक काढून दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी सीबीआयसंदर्भात काढलेल्या कोणत्याही निष्कर्षाबाबतची माहिती चुकीची असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.